Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफ – सफाई व्यवस्थित करावी-मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांची मागणी.

 

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा

सध्या पावसाळ्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस कधीही पडू शकतो. त्याअनुषंगाने उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पॅनल क्र -१३ मध्ये गेल्या पावसाळ्यात काही भाग पाण्यात गेला होता.त्याचे मुख्य कारण म्हणजे नाले सफाई व्यवस्थित झाली नाही.

गेल्या दोन वर्षांचा अनुभव घेता पॅनल क्र -१३ मध्ये काही नाले आहे जे पावसाळ्यापूर्वी त्यांची व्यवस्थित सफाई करणे गरजेचे आहे. याचा विचार करून मनसेचे अँड.प्रदिप गोडसे यांच्यावतीने उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, मुख्य स्वछता निरीक्ष यांना प्रभाग क्र -१३ मधील विशेषतः प्रथम स्थानी लालचक्की भागातील श्री.कृष्ण कॉलनी, शिव मार्ग मागील नाला, ज्योती कॉलनी येथील नाला, पांच पांडव येथील नाला, हनुमान नगर येथील नाला, गुलमोहर समोरील नाला, डॉ. शेगावकर समोरील नाला पहिल्या टप्प्यात साफ करून घेण्यास यावे याकरिता निवेदन देऊन अधिकारी सोबत चर्चा करण्यात आली.कारण यापरिसरातील नाले वेळेवर व व्यवस्थित साफ न झाल्याने त्याचा फटका या भागातील नागरिकांना बसत होता.

दुसऱ्या टप्प्यात सानेगुरुजी नगर येथील नाला, राहुल नगर येथील नाला, लोकमान्य किराणा येथील नाला, सीताराम नगर येथील नाला, सरदार पाडा येथील नाला, वॉटर सप्लाय येथील नाला साफ करण्यास विंनंती केली आहे.

सदर पत्राद्वारे पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र -१३ मधील अंबिका विभाग, लालचक्की विभाग, सुभाष टेकडी विभाग व सुभाष टेकडी विभागातील सर्वच मोठे व लहान नाले साफ करावेत जेणेकरून पावसाळ्यामुळे नाल्यातील पाणी घरात जाणार नाही व रोगराई पसरणार नाही.





Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights