महेश गायकवाड यांच्या मध्यस्थीने सेंट थॉमस स्कूलने केली 15 टक्के फी वाढ रद्द, पालकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण.
कल्याण: नीतू विश्वकर्मा
कल्याण पूर्व विजय नगर मधील प्रसिद्ध सेंट थॉमस स्कूल यांनी कोविड काळामध्ये फी वाढ न केल्यामुळे एकाच वेळी 35 टक्के फी वाढ केल्याने पालक वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला होता. पालक वर्ग यांनी कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांची भेट घेऊन फी वाढ संदर्भामध्ये स्कूल प्रशासन सोबत सकारात्मक बैठक लावून (15%) पंधरा टक्के फी वाढ कमी करण्यात आली. स्कूल प्रशासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन पंधरा टक्के वाढीव स्कूल फी कमी करण्याचे मान्य केले, त्यामुळे पालक वर्गाने महेश गायकवाड आणि स्कूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. आनंदाच्या वातावरण एकच जल्लोष केला. आपल्या विभागातल्या कोणत्याही समस्या आपण सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असू असे महेश गायकवाड यांनी सांगितले, आणि सेंट थॉमस स्कूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.