विजग्राहकांन कडून अतिरिक्त सुरक्षा ठेव वसुल करण्यास उल्हासनगर मनसेचा विरोध.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
नेहमी प्रमाणे महावितरण ने विजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव ( Additional security deposit ) च्या नावाखाली अतिरिक्त विजबिल पाठविले आहे.आत्ताच कुठे कोविडच्या दोन वर्षाच्या कालावधी तुन नागरिक सावरत असतांना महावितरणने मागच्याच महिन्यात विजग्राहकांना विजबिल दरवाढीचा शॉक दिला असतांना पुन्हा अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली ग्राहकांच्या खिश्यावर छुप्या मार्गाने हळूच हात घातला आहे व ही ग्राहकांची लूट आहे व अशी लूट करणे योग्य नाही.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अशा प्रकारे अतिरिक्त सुरक्षा ठेव ( Additional security deposit ) वसुल करण्यास विरोध आहे.अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची वसुली करण्यासाठी विजग्राहकांवर जोरजबरस्ती करू नये.ही रक्कम वसुल करण्यासाठी विजग्राहकांना जोर-जबरदस्ती केल्यास मनसे आपल्या पद्धतीने धडा शिकवेल याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महावितरणला लेखी,तोंडी,तसेच दूरध्वणीच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करून सुद्धा महावितरण कंपनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला तयार नाही.बरेच ग्राहक एक वेळ आपल्या घरातील किराणा भरत नाहीत पण विजबिल वेळेवर भरतात.ग्राहकाच एक महिन्याच विजबील थकल असेल तर महावितरणचे अधिकारी ग्राहकांच्या घराची किंवा दुकानाची विज कापतात.विजबिल भरायला सात ते आठ दिवस उशीर झाल्यास ग्राहकांना महावितरण कडून दंड आकरतो,एखादया ग्राहकांकडून अनअवधानाने जर काही चूक झाली तर महावितरण कंपनी त्या ग्रहकांकडून दुपटी तिपटिने दंड वसुल करते.महावितरण कंपनी जर आर्थिक बाबतीत जर एवढी सक्त वागत असेल तर मग ग्राहकांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याची जबादारी ही महावितरणची नाही का..? असा प्रश्न मनसेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.महावितरणने ग्राहकांच्या तक्रारीची वेळेत दखल घेऊन त्यांना दिलासा देणे,ग्राहकांशी सौजण्याने वागणे व ग्राहकांना तेवढ्याच चांगल्या सेवा-सुविधा पुरविणे हे काम महावितरणच नाही का..? असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला ग्राहक देव असतो असं म्हणतात पण आपले अधिकारी व कर्मचारी कदाचित ग्राहकला देव मानत नसतील पण कमीतकमी आपल्या ग्राहकांशी उद्धट वर्तणूक तर नको व्हायला याची दक्षता महावितरण कडून घेण्यात यावी.
सध्या नवीन मिटर संदर्भात महावितरण कार्यालयाच्या असंख्य तक्रारी प्राप्त होत आहेत.महावितरणचे अधिकारी नवीन विजमिटर उपलब्ध नसल्याचे कारण देत विजग्राहकांना वेठीस धरतात ही बाब गंभीर आहे.विशेष बाब म्हणजे मार्केट मध्ये मोठया प्रमाणात नविन विजमिटर उपलब्ध असतांना महावितरणकडे नविन विजमिटर उपलब्ध नाहीत याचा नक्की अर्थ काय घ्यायचा.आपल्या कार्यालयात एजंट मार्फत आल्यास विज मिटर उपलब्ध होते परंतु जर ग्राहक स्वतःहा विजमिटर मागत असेल तर त्याला वेगवेगळी कारणे सांगून आपले अधिकारी फेऱ्या मारायला लावतात हे तात्काळ थांबायला हवं व विजग्राहकांना विजमिटर त्वरित उपलब्ध करून देण्यात यावं.यापुढे नविन विजमिटर साठी किंवा ग्राकाकांच्या तक्रार निवारणासाठी विज ग्राहकांना वेठीस धरल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवू असा इशारा बंडू देशमुख यांनी महावितरणला दिला आहे.यावेळी शहर अध्यक्ष बंडू देशमुख,उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,सुभाष हटकर,ऍड.अनिल जाधव,शैलेश पांडव शहर संघटक मैनऊद्दीन शेख,वाहतूक सेनेचे काळू थोरात,रस्ते आस्थापना विभागाचे संतोष बोरसे, सागर चौहान,विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे,अनिल गोधडे,प्रमोद पालकर, सुहास बनसोडे उपविभाग अध्यक्ष विष्णू जाधव,विक्की जिप्सन,रवी पाल,यांच्यासह कैलास घोरपडे,संतोष खत्रे,अरुण वडनेरे,सुरज बेंडके,साहिल पांढरे,नविन मूल्या,प्रकाश कारंडे,अजय परमार,अमित फुंदे महिला सेनेच्या विशाखा गोधडे,सिमा तिवारी,देव्यानी पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.