उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर – ५ मधिल स्वामी शांती प्रकाश पुतळा ते अशोक लोणचे दुकान ( भाटिया रोड) पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे तसेच स्वामी शांती प्रकाश उद्यान सुशोभीकरण करणे या कामांकरिता नगरविकास विभागाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून ही अद्याप पर्यंत या कामांना सुरुवात झाली नव्हती. याबाबत नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महानगरपालिकेच्या अभियंत्यासह या रस्त्याची पाहणी करत दोन्ही मंजूर विकास कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त श्री.अजीज शेख यांना दिल्या. त्यानुसार रस्त्याच्या काँक्रिटीकरण्याच्या कामाला आजच सुरुवात झाली असून उद्यान सुशोभीकरण करण्याच्या उर्वरित कामाला येत्या दोन दिवसांत सुरुवात होणार आहे.
स्वामी शांती प्रकाश पुतळा ते अशोक लोणचे दुकान ( भाटिया रोड) हा रस्ता उल्हासनगर शहरातील महत्वाचा रस्ता असून या रस्त्याचे काँक्रीटीकरणामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याने आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी तत्काळ या कामाला सुरुवात करून दिल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख श्री.विजय पाटील, उपविभागप्रमुख श्री. आदिनाथ कोरडे, श्री. विलास काकडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण साठे, महानगरपालिका बांधकाम विभाग अभियंता श्री.अश्विन आहुजा आदी उपस्थित होते.





