खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आज कल्याण पूर्व १०० फुटी रोड वरून श्री गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ४ हजार चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी शिवसेनेकडून आज शनिवारी मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
कोकणात जाणाऱ्या चार (०४) हजार चाकमानांसाठी शिवसेनेच्या वतीने चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग कोल्हापूर, सातारा मोफत बस सेवा देण्यात आली परंतु येताना त्याच कोकणवासी यांचे वाहन सेवा सुरळीत नसल्याने हाल होतात याविषयी खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारले असता तशा प्रकारची सूचना आमच्याकडे आली तर त्यासाठी उपाययोजना करू असे त्यांनी या वेळेस सांगितले.
या चाकरमान्यांना मोफत बसणे सोडण्यासाठी कल्याण पूर्व शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आले होते. यावेळेस कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकर, उपशहर प्रमुख दिलीप दाखीणकर, प्रशांत बोटे, शहर संघटक पुष्पा ठाकरे, सुशीला माळी, नवीन गवळी, राहुल पाटील, शंकर पाटिल, प्रशांत अमिन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कल्याण लोकसभा क्षेत्रातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ९८ बसेस सोडण्यात आल्या. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी या बसेसना भगवा झेंडा दाखवून बस कोकणाकडे रवाना केल्या.