प्रान्त कार्यालय खडकपाड़ा कल्याण येथे १२ सप्टेंबर पासुन आमरण उपोषण सुरु.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय बौद्ध स्थळ बुद्धभूमी फाउंडेशन येथे उपविभागीय प्रांत अधिकारी श्री विश्वास गुजर यांच्या आदेशानुसार पोलीस बळाचा वापर करून असंविधानिक बेकायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईचा व या संबंधित असलेल्या प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करीत प्रान्त कार्यालय खडकपाड़ा कल्याण येथे 12 सप्टेंबर पासुन आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे,
प्राप्त माहितीनुसार, मौजे चिकणगर, ता. कल्याण येथील स. क्र. ५६/२/३/४, ५७ व ५८पै ची जागा गेल्या ४२ वर्षापासून प्रत्यक्ष ताबा-हक्क व कब्जा वहिवाट तसेच कागदोपत्री सुद्धा आंबेडकरी बौद्ध समाजाच्या बुद्धभूमी फाउंडेशन व विश्वस्तांच्या आहे. सदर जागेवर बुद्धमूर्तीची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे तसेच धार्मिक महत्त्व असलेले दहा ते बारा बोधिवृक्ष या मिळकतीवर लावण्यात आलेली आहे. या जागेतील ३१ गुंठे एवढी जागा रेल्वे प्रकल्पामध्ये अधिग्रहण केले जात असून त्या जागेच्या कोणत्याही प्रकारच्या मोबदला बौद्ध समाजाच्या बुद्धभूमी फाउंडेशनला दिला गेलेला नसताना देखील दि.१२/०९/२०२३ रोजी श्री विश्वास गुजर प्रांत अधिकारी कल्याण व श्री वर्मा मध्य रेल्वे अधिकारी व त्यांचे सहकारी या गैर अनुसूचित जाती जनजाती धर्माच्या लोकांनी बेकायदेशीर रित्या बौद्ध धर्मीयांना पवित्र असलेल्या बुद्धमूर्त्या काढून बौद्ध समाजाच्या कब्जा वहिवाटी मध्ये असलेल्या जागेच्या ताबा बेकायदेशीर रित्या काढून घेतला. त्यामुळे बौद्ध धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तरी श्री विश्वास गुजर व श्री वर्मा व त्यांचे सहकारी या गैर अनुसूचित जाती जनजातीच्या लोकांनी ४२ वर्षापासून बौद्ध समाजाच्या ताब्यात असलेल्या जागेवर गैर मार्गाने व बेकायदेशीरपणे कारवाई केल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे. सदर बुद्धांच्या मुर्त्या हटवण्याची कारवाई आणि जमीन अधिग्रहण करण्याचे कारवाई घाई घाईने करण्यात आलेली असून सदर प्रकरणाची याचिका मा. मुंबई खंडपीठामध्ये दाखल असून न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना आम्हाला आमची कोणतेही कायदेशीर व न्याय बाजू मांडण्याचे संधी देण्यात आलेले नाही. त्यामुळे सुद्धा या कारवाईबद्दल समाजाच्या मनामध्ये असंतोष आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावणे, बुद्ध मूर्ती हटविणे, बेकायदेशीरपणे जमीन अधिग्रहण करणे, वरील मिळकतीवर असलेले २ बुद्ध मूर्ती व १२ बोधिवृक्षांचे नोंद नुकसान भरपाईचे अवॉर्ड रिपोर्टवर जाणून बुजून न घेणे, प्रकरण खंडपिठामध्ये न्यायप्रविष्ठ असताना देखील कोणतेही कायदेशीर बाजू मांडण्याची संधी न देणे, जमीन अधिग्रहण करण्याचा कोणत्याही मोबदला न देता निधीचे परस्पर वाटप करणे याबद्दल वर उल्लेख केलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांवर व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी व आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा अश्या प्रकारचे पत्रव्यवहार बुद्धभुमी फाउंडेशन द्वारे शासन प्रशासनास करण्यात आले आहे, तसेच ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय बौद्ध स्थळ बुद्धभूमी फाउंडेशन येथे उपविभागीय प्रांत अधिकारी श्री विश्वास गुजर यांच्या आदेशानुसार पोलीस बळाचा वापर करून असंविधानिक बेकायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईचा व या संबंधित असलेल्या प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करीत प्रान्त कार्यालय खडकपाड़ा कल्याण येथे १२ सप्टेंबर पासुन आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे,अशी माहिती बुद्धभुमी फाउंडेशन चे गौतमरत्न भंतेजी यानी दिली.