Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News
बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यातील जागा रेल्वेने अधिग्रहित केल्याने सुरू असलेले उपोषण आश्वासन नंतर मागे.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने भंते ब्रह्मरत्न (वय 65 वर्ष) यांचे आमरण उपोषण काल दि. १४/०९/२०२३ रोजी सा. ७ वा मध्यममार्ग अवलंबून अंशिक यश मिळवून सर्वानुमते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
खडकपाडा परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिका यांच्या मोठ्या संख्येने दररोजची उपस्थिती मोलाची ठरली.
बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने सदर आमरण उपोषण कार्यक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने सहभागी झालेल्या सर्व पक्ष संघटना, संस्था, विहार कमिट्या , उपासक उपासिका, पत्रकार बंधू भगिनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व मंगल मैत्री.
मा. सब डिव्हिजनल ऑफिसर यांनी पूज्य भंते ब्रम्हरत्न यांना शहाळे ( नारळ पाणी ) देऊन सदर उपोषणाची सन्मानपूर्वक समाप्ती केली.
बुद्धभूमी फाउंडेशन येथे जागतिक दर्जाचे इंटरनॅशनल बुद्धिस्ट थीम पार्क व महाबोधी महाविहार प्रतिकृती निर्माण होण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सोबत भिक्खूसंघ व शिष्टमंडळ यांच्या दोन वेळ भेट झाली आहे. रेल्वे अधिग्रहण होत असलेल्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या वहिवाटीतील 31 गुंठे जागेवरून भगवान गौतम बुद्धांच्या दोन मूर्ती बेकादेशीरित्या रेल्वे विभाग व प्रांताधिकारी यांनी हटवल्याचेही माहिती खासदार साहेबांना देण्यात आली.
बुद्धभूमी फाउंडेशनला जेवढा निधी लागेल तेवढा निधी दिला जाईल, या ठिकाणी जागतिक बुद्धिस्ट सेंटर निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही खासदार साहेबांनी दिली.
कल्याण नगरीमध्ये जागतिक बौद्ध धम्मगुरु नोबेल पारितोषिक विजेते परम पावन दलाई लामा यांनाही आणण्याचे खासदार साहेबांचा मानस आहे. आमरण उपोषण सोडल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रमुख भदंत गौतमरत्न महाथेरो यांच्यासोबत फोनवर बोलताना आनंद जाहीर केला.
बुद्धभूमी फाउंडेशनच्या पुढील विकास व आमरण उपोषण शांततेत पार पाडण्यासाठी शहर प्रमुख महेश गायकवाड, सुमित हुमने तसेच त्यांचे सोबत बुद्धभूमी फाउंडेशनचे नंदिनीताई साळवे, रोहिणी ताई जाधव, वनिता गंभीर, अर्जुन साळवे, नवीन गायकवाड, अण्णासाहेब रोकडे, निर्मलकुमार घुणकीकर, विजय हळदे, महानंदाताई खोब्रागडे, शोभा सूरदास, एड. आशिष इंगळे, अशोक बाविस्कर, गणेश मोरे, विनायक मनोहर, भाऊसाहेब बनसोडे, एड रोहित कांबळे, एड सोनाली भगत, सुनील घेगडमल, अनिल कीर्तने, चंद्रकांत वाकचौडे, भगवान कांबळे, कॅप्टन महेंद्र केदारे, चंद्रमणी मेश्राम, डॉ. मारिया फर्नांडिस, शोभाताई इंगळे, इंजि. बिरजू जाधव, सुबोध भारत, कैलाश गायकवाड, माधुरीताई सपकाळे, सुनील मडके, गणेश मोरे, प्रताप माने, डॉ.महेंद्र दहिवले, प्राध्यापक सुहास चव्हाण, राहुल वाघ, राजू रोकडे, रोहित खरात, सागर तायडे, गिरीश विसांबरे, अरुण हिवरे, रूपाली कडलक, संतोष गाडे, श्याम शेवाळे, कराटे मास्तर साळवी, सुभाष शेंडगे, सुनील अहिरे, सुरेश कटारे, विनय फुलपगार तसेच खडकपाडा व कल्याण नगरीतील तमाम आंबेडकरी बौद्ध जनता व मॉर्निंग वॉक उपासकाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतले होते.