उल्हासनगर कांग्रेसच्या आंदोलनास यश.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
अखेर टॅक्स पावती वाटप केलेल्या बचत गटाच्या महिलांचे ८ महिन्यापासून थकबाकी असलेले देयक कोलब्रो कंपनी तर्फे दोन ते तीन दिवसात मोबदला देणार असल्याची उल्हासनगर महानगरपालिकेचे लेखी आश्वासन.
उल्हासनगर महानगरपालिके समोर काँग्रेसच्या माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या नेतृत्वात , उल्हासनगर काँग्रेस व महिला बचत गट यांचे संयुक्त धरणे आंदोलन यशस्वी.
काँग्रेसच्या माजी नगरसेविका अंजली साळवे यांनी मा आयुक्तांना वारंवार भेटून बचत गटाच्या महिलांनी ज्या टॅक्स पावती वाटप केलेले आहे त्यांच्या कामाचे पैसे कोलब्रो कंपनी तर्फे देण्यासंदर्भात प्रत्यक्ष भेटून ,बचत गटाच्या महिलांसोबत येऊन सुद्धा वारंवार विनंती केलेली होती की त्यांचे कामाचे पैसे त्यांना त्वरित देण्यात यावे, पावती वाटप करून आठ दहा महिने झाले ,कोलब्रो कंपनी स्वतःच्या बिल काढत असताना देखील महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही, त्यांच्या रोजगाराचे पैसे मिळत नाही ही महानगरपालिकेला शरम आणणारी गोष्ट आहे, सादर कंपनी जाणून बुजून महिला बचत गटाच्या महिलां तर्फे हे काम हिरावून घेऊन कंत्राटी पदतीने करण्यासाठी बचत गटाच्या महिलांना त्रास देत आहे ,बचत गटाच्या महिला ह्या अत्यंत गरजू महिला आहेत त्यांचे पेमेंट ताबडतोब व्हायला पाहिजे ,पावत्या झाल्यावर एक महिन्याच्या आत तरी त्यांचे पेमेंट व्हायलाच हवे ह्याची जवाबदारी महानगरपालिकेने घ्यायला हवी ,नुकताच वेळेवर पगार न झाल्याने महानगरपालिका शहाड येथील हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केली , तरीही पुन्हा अशी घटना घडू नये या साठी गुरुवार दिनांक ३०/०५/२०२४ सर्व बचत गटाच्या महिलां सोबत काँग्रेस पार्टी तर्फे महानगरपालिका यांना जाब विचारण्यासाठी मुख्यालय प्रवेश द्वारा समोर १२ वाजता धरणे आंदोलन घेण्यात आले.
ह्या नंतर महानगरपालिका प्रशासना तर्फे उपयुक्त डॉ सुभाष जाधव व कर निरीक्षक जेठानंद कारामचंदानी ह्यांनी आंदोलकांची भेट घेतली व लेखी शाश्वती दिले कि दि २९/०५/२०२४ रोजी कोलब्रो ग्रुप यांना मनपातर्फे देयक अदायगी झाली असल्यानंर दि ३०/०५/२०२४ पासून महिला बचत गटाच्या बिल वाटपाचे मोबदला काम सुरु करण्यात येईल व तीन ते चार दिवसात संपूर्ण मोबदलाचे काम पूर्ण होणार.
त्याच सोबत आंदोलकांची जी दुसरं मागणी होती की बिल वाटपाचे काम कॉलब्रो ग्रुप कडून थेट महानगरपालिके तर्फे करण्यात यावा , ह्यावर लवकरच आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल असल्याचे सांगितले तसेच विधानसभा विरोधी पक्ष नेता विजय वड्डेतेवर यांच्या कोलब्रो कंपनीच्या गैर व्यवहाराच्या चौकशीच्या मागणीचा अहवाल लवकर देण्यात असल्याचे उपयुक्त डॉ सुभाष जाधव ह्यांनी आश्वासित केल्या नंतर सादर आंदोलन माघे घेण्यात आले.
ह्या वेळी माजी नगरसेविका अंजली साळवे , अध्यक्ष रोहित साळवे , महिला अध्यक्ष मनीषा महाकाळे , सिंधुताई रामटेके , मालती गवई , कालिंदी गवई ,मंगला मुजुमदार , राकेश मिश्रा , अनिल यादव , शैलेंद्र रुपेकर , फरियाद शेख , फॅमिदा सैयद कायद्याने वागा संघटनेचे संजय वाघमारे , अण्णा देशमुख व अनेक महिला बचत गटाच्या महिला उपस्तिथ होत्या.