Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewsUlhasnagarUlhasnagar Breaking News

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने काल बौद्ध विहार संघटना समन्वय समिती-जिल्हा ठाणे च्या माध्यमातून बुद्ध भूमी फाऊंडेशन वालधुनी कल्याण येथे १० वी व १२ वी च्या मुलांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शनाबद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

कल्याण: नीतू विश्वकर्मा 

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने काल बौद्ध विहार संघटना समन्वय समिती-जिल्हा ठाणे च्या माध्यमातून बुद्ध भूमी फाऊंडेशन वालधुनी कल्याण येथे १० वी व १२ वी च्या मुलांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शनाबद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ह्या कार्यक्रमात बुध्द भुमी फाउंडेशन चे अध्यक्ष भदंत गौतमरत्न महाथेरो, शासकीय सेंट्रल हाॅस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ मनोहर बनसोडे,  किरन्सं युनिक अकादमीचे संचालक इं.किरण साळवे,  मुंबई विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर चे डॉ सुमेध पारधे, मुख्य समन्वयक आयु विनायक आठवले,मुख्य समन्वयक  नविन गायकवाड,  मुख्य समन्वयक आयु विजय हळदे ,मुख्य समन्वयक रोहिणीताई जाधव, डॉ. महेंद्र दहिवले,  आयु राजु रोकडे, मुख्य समन्वयक डाॅ.अलका पवार, डॉ.बावीस्कर  यांची विशेष उपस्थिती लाभली. 

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बौध्द विहार संघटना समन्वय समितीचे सर्व दानदाते, सर्व समन्वयक तसेच सहभागी संस्था संघटना तसेच विद्यार्थी पालकवर्गाचे सहकार्य लाभले.

मुख्य समन्वय नविन गायकवाड  यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना  करुन पुढिल कार्यक्रमात छायाताई उंबरे व साक्षीताई डोळस यांनी सुञ संचालनाची जबाबदारी पार पाडली..तसेच रोहित खरात,  संतोष अंभगे, अंभगे ताई,  मंगलाताई जाधव  व अन्य समन्वकांचे सहकार्य हया कार्यक्रमात लाभले… विजय हळदे यांनी सर्वाचे आभार मानुन कालचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights