वालधुनी उपनदीच्या पात्रात अतिक्रमण, तात्काळ काम बंद करावे अन्यथा सदरचे काम रद्द करुन आपल्या संस्थेवर काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कारवाई करणेत येईल : ठेकेदारास अंनपा ची तम्बी.
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ पुर्व गोविंदतीर्थ येथे वाहणाऱ्या वालधुनी उपनदीवर असलेल्या स्मशानभूमी जवळील लोकनगरी पूल अंबरनाथ-पूर्व येथे पुलाच्या पूर्वेस पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जेसीबी यंत्र सामग्री लावून भर पात्रात काम सुरु असून अशा प्रकारे खोद काम करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्याची तयारी सुरु असून वाहत्या वालधुनी उपनदीच्या नैसर्गिक पात्रास अड़थळा निर्माण होईल असे कार्य सुरु आहे.
ही गंभीर बाब अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटी लि. फार्मिंग सोसायटी द्वारे पत्रव्यवहार करुन अंबरनाथ मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना तक्रार करण्यात आली आहे. संस्थेच्या जमीनी विषयी प्रकरण मा. हायकोर्ट, मुंबई येथे सुरु असताना व मा. कोटनि स्थगिती आदेश दिले असताना अशा प्रकारे संस्थेच्या जमीनी मधून वाहणाऱ्या वालधुनी उपनदीच्या पात्रात अतिक्रमण करणार यानी या ठिकाणी नगरपालिके तर्फे काम सुरु असल्याचे विचारणा करणाऱ्याना सांगणे हे अत्यंत चिंता जनक आहे.
या ठिकाणी सुरु असलेले कामकाज आपण स्वतः लक्ष घालून ताबडतोब थांबवावे व या ठिकाणी केलेले अतिक्रमण, भराव इ. जे काही काम करण्यात आले आहे ते जमीनदोस्त करून उपनदी पात्र पूर्ववत करावे तसेच पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करावी अशी मागणी वालधुनी नदी संवर्धन समीती व फार्मिंग सोसायटी द्वारे करताच अंबरनाथ नगरपरिषद तर्फे मे.एम.सी. चंदनानी कंन्स्ट्रशन कंपनी, उल्हासनगर ला पत्र देऊन जिल्हास्तर नगरोत्थान अभियान अंतर्गत अंबरनाथ पुर्वेकडील लोकनगरी स्मशानभूमी जवळील नाल्याला रिटेनिंग वॉल बांधणेकामी स्थागिती दिली,
मिळालेल्या माहिती नुसार एम. सी. चंदनानी कंन्स्ट्रशन कंपनी, उल्हासनगर यांना दि. 15 मार्च 2024 रोजी देण्यात आले होते. सदर काम प्रत्यक्ष कार्यस्थळावर सुरु असताना अस्तित्वातील लोकनगरी नाल्याची रुंदी कमी करून बांधकाम करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या,
यासाठी रिटेनिंग बॉलचे बांधकाम तात्काळ बंद करण्यासाठी वांरवार तोंडी सुचना देण्यात आले आहेत. तरी सुध्दा नियमबाहय काम सुरुचे ठेवले आहे. तसेच आपणांस संदर्भिय पत्र क्र. 02 व 03 अन्वये रिटेनिंग वॉलचे बांधकाम तात्काळ बंद करण्यासाठी लेखी आदेश देण्यात आले आहे. तरी सुध्दा आपण काम सुरुचे ठेवले आहे. ही गंभीर बाब आहे. तरी या पत्राद्वारे कळविण्यात येते की, आपण ही नोटीस मिळताच तात्काळ काम बंद करावे अन्यथा सदरचे काम रह करुन आपल्या संस्थेवर काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कारवाई करणेत येईल. यांची नोंद घ्यावी असे पत्र संजय कुंभार, नगरअभियंता, अंबरनाथ नगरपरिषद तर्फे ठेकेदारास देण्यात आले आहे.