संगीता लहाने -काळे उल्हासनगर महानगरपालिका मुन्सिपल लेबर युनियन चे सरचिटणीस चे पदी नियुक्ती.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
दिनांक 25 जून 2024 रोजी उल्हासनगर महानगरपालिका मुन्सिपल लेबर युनियन च्या सरचिटणीस पदी सौ संगीता लहाने काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या समग्र शिक्षा विभागाच्या प्रमुख सौ संगीता लहाने- काळे यांना मुनिसिपल लेबर युनियनच्या दिनांक 21 /6 /2024 रोजी च्या कार्यकारणी सभेत नियुक्ती संघटनेच्या उल्हासनगर महापालिका युनिटच्या सरचिटणीस पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे . सदर मुन्सिपल लेबर युनियन ही ठाणे महानगरपालिकेतील एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटना आहे. सौ संगीता लहाने या उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांचे शिक्षण बीकॉम, एलएलबी व स्पेशल एज्युकेशन चा कोर्स केलेला आहे व अजूनही त्या शिक्षण घेत आहेत त्यांच्या कामाची तळमळ बघून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
उल्हासनगर महानगरपालिकेतील आपल्या संघटनेच्या वाढीकरिता त्यांनी दिलेले योगदान व दिव्यांग मुलांसाठी केलेले कार्य व त्यांचे योगदान पाहून सामाजिक कार्यासाठी त्यांची दृढनिश्चयता पाहून पुढील कार्य यशस्वी यशस्वीपणे हो व अनेकांना अनेकांचे सहकार्य त्यांना मिळो अशी आशा बाळगून सौ.संगीता लहाने काळे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे सर्वत्र आनंद दिसून येत आहे.यामध्ये युनिटचे अध्यक्ष रमेश एस आगळे यांनी सहयोग केले आहे. तसेच कथोरिया यांना सुद्धा उपाध्यक्ष चे पद देण्यात आले आहे.संगीता लहाने -काळे युनिटचे सरचिटणीस मुन्सिपल लेबर युनियन आपल्या या नियुक्तीनंतर बोलताना सांगितले की ठाणे महानगरपालिकेतील एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटना आहे.