पावसामुळे कमकुवत झालेल्या साई आर्केड इमारत, नेताजी चौक, उल्हासनगर-4 येथील इमारतीचा स्लॅबचा भाग कोसळला.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
दिनांक : ०३/०७/२०२४. रोजी सायंकाळी उल्हासनगर-4 येथील नेताजी चौक येथील साई आर्केड इमारतीच्या स्लॅबचा एक भाग कोसळला असून, कोणीही जखमी झाले नाही; परंतु भविष्यात यामुळे कोचिंग क्लासमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि दुकानदारांना मोठा धोका निर्माण होत आहे.
या इमारतीमध्ये न्यू इंग्लिश जुनियर कॉलेज यांचे आयटी वर्ग तसेच अनेक प्रायव्हेट कोचिंग क्लासेस यांचा समावेश असून दर दिवसाला अंदाजे १००० विद्यार्थी या इमारतीत शिकण्यासाठी येतात.
या प्रकरणी, राज प्रकाश महाडिक (अंबरनाथ विधानसभा युवा सेना अधिकारी ) यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निवेदन तथा इशारा दिला की आपण तात्काळ गंभीर दखल न घेतल्यास व भविष्यात कुठल्याही प्रकारची दुर्घटना किंवा जीवित हानी झाल्यास उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन याला जबाबदार राहील.
सदर प्रकरण कळताच तत्काळ घटनास्थळी युवा सेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊ म्हात्रे (कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष युवा सेना), राज प्रकाश महाडिक (अंबरनाथ विधानसभा अधिकारी युवा सेना), अंकुश भांडे (उल्हासनगर शहर अधिकारी युवा सेना), वैभव गायकवाड ( उल्हासनगर शहर चिटणीस युवासेना), महेश घोरपडे ( विभाग अधिकारी युवा सेना), रोनाल्ड रोझारियो ( युवा सैनिक), गणेश शिंगाडे शाखाप्रमुख उपस्थित होते.