Navi Mumbai

कोकण भवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्व तयारीची बैठक संपन्न.

नवी मुंबई: नीतू विश्वकर्मा

दि.29 स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आज पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) अमोल यादव  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
कोकण भवनातील पहिला मजला समिती सभागृह येथे झालेल्या या बैठकीत कोकण विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय स्तरावरील मुख्य ध्वजारोहण गुरुवार, दि. 15 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता करण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहेत.   मुख्य शासकीय ध्वजारोहण कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात साजरा होणार असून, त्या अनुषंगाने बैठकीत मार्गदर्शन करताना श्री.अमोल यादव  यांनी कोकण भवनातील सर्व शासकीय यंत्रणांना हा सोहळा यशस्वीरित्या व उत्साहात साजरा करण्याबाबत सूचना दिल्या.  प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी आणि हा कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे  ही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights