मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मध्ये उल्हासनगर मधील पूज्य चालिया साहेब मंदिराचा समावेश करावा-आमदार कुमार आयलानी.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
राज्यातील वय 60 वर्षांवर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू केलेले असून या योजनेमध्ये महाराष्ट्र मथील प्रसिद्ध असलेल्या 66 तीर्थ क्षेत्राचा समावेश केलेला असून यामध्ये उल्हासनगर शहरातील प्रसिद्ध असलेल्या पूज्य चलिया साहेब मंदिर यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये उल्हासनगर शहरातील प्रसिद्ध असलेल्या आणि राज्य सरकार ने घोषीत केलेले तीर्थक्षेत्र पूज्य चालिया साहेब मंदिर याचा समावेश करावा अशी मागणी 141 उल्हासनगर विधानसभा आमदार कुमार आयलानी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवार तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई व ठाणे जिल्हाधिकारी व माननीय आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांच्याकडे आज दिनांक 28/7/2024 रोजी पत्राद्वारे केली आहे.