Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

उल्हासनगर महानगर पालिकेच्या मलनिःसारण विभागाचे अजग कारभार.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा

उल्हासनगर पूर्व येथील प्रभाग समिती ०४ येथील प्रभाग क्रमांक १८ येथील रामजी आंबेडकर नगर येथील अजिंक्य सोसायटी ते बुद्ध विहार पर्यंत असलेल्या रस्त्यावरील मलनिःसारण ड्रेनेज चे झाकण रस्त्याच्या उंची पेक्षा अर्धा इंच वर बनविण्यात आले आहे. सदर काम हे गेल्या ८ ते १० महिन्या आधी झाले असून ,सदर ठिकाणी ना नवीन रस्ता बनविण्यात आला ना ते झाकण ची उंची कमी करण्यात आले.

रस्त्यापेक्षा झाकण मोठे ( वर आले ) असल्यामुळे सदर रस्त्यावरून रिक्षा घेऊन जाणे खूप कठीण झाले तसेच रात्रीच्या वेळी दोन चाकी वाहनांचे ही त्या झाकण मुळे अपघात होत आहे ,तसेच रात्रीच्या वेळी महिलांना तसेच वयोवृध्द नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सदर विषयाची तक्रार कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांना ॲड प्रशांत चंदनशिव यांनी ते सर्व झाकण रस्त्याच्या उंची पेक्षा मोठे न ठेवता ते कमी करण्याचे निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights