शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कल्याण पूर्व आयोजित वृक्षारोप सप्ताह.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्व युवा सेनेच्या माध्यमातून कल्याण पूर्व मध्ये वृक्षारोपण सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.त्यातील पहिला टप्पा आज पार पडला वृक्षारोपणासाठी आज कोळशेवाडी पोलीस स्टेशन आवारातून शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.हर्षवर्धन पालांडे,शहर प्रमुख श्री. शरद पाटील,युवासेना विस्तारक श्री.कामेश जाधव , युवासेना उपजिल्हाधिकारी श्री.हेमंत केणे, विधानसभा सचिव प्रशांतो शील, तसेच कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली. तरी या कार्यक्रमात शिवसेना उपशहरप्रमुख,विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, सर्व शिवसैनिक युवासैनिक व कल्याण पूर्वेतील पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच कल्याण पूर्व युवासेनेने कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख सन्मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पोलीस अधिकारी यांना पेढे वाटून पोलीस प्रशासनाचे तोंड गोड करत वाढदिवसाचा आनंद साजरा केला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पूर्व युवासेना शहर अधिकारी ॲड.निरज कुमार,शहर सचिव श्री.शेखर पिसाळ ,शहर समन्वयक सागर वाळवे, शहर चिटणीस श्री.अमित उगले, माजी शहर चिटणीस सागर पावशे, कल्याण पूर्व उपशहर अधिकारी श्री.विकास पावशे, निकेतन ढोणे, श्री.दत्ता पाखरे, श्री.दिपक चौधरी, श्री.भैरव वाघमारे, मोहन जाधव, श्री.अमित कदम, सोशल मिडिया समन्वयक श्री.पंकज पांडे, श्री.विनायक डायरे, श्री.प्रशांत देशमुख,श्री.हरेश इंगळे,प्रणय झाड़े, ऋषभ शुक्ला, आकाश दुसाने तसेच युवासेनेचे सर्व पदाधिकारी युवासैनिक कल्याण पूर्व या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.