Breaking NewsfestivalheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News

कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी वरुण पाटील.

कल्याण  : नीतू विश्वकर्मा

कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची प्रमूख संस्था असलेल्या “कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळा”च्या अध्यक्षपदी भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या महामंडळाच्या बैठकीत वरुण पाटील यांच्याकडे ही अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

“कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ” ही गेल्या 35 वर्षांपासून कल्याणात कार्यरत असून कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये या महामंडळाला मानाचे स्थान आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या अडचणी, विविध मुद्द्यांसठी शासन – प्रशासन स्तरावर करावा लागणारा पाठपुरावा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर गणेश मंडळांना लागणारे आवश्यक ते सहकार्य करण्याचे काम या कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून केले जाते.

तर दरवर्षी कल्याणातील प्रतिष्ठीत व्यक्तीकडे या महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाते. त्यानुसार यंदा 2024-25 साठी या महामंडळाच्या अध्यक्षादाचा मान कल्याण पश्चिमचे भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांना मिळाला आहे.

आपल्याला ही संधी दिल्याबद्दल महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानत असून कल्याणातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या अडचणी – समस्या आपण सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण पाटील यांनी दिली आहे.

या बैठकीला महामंडळाचे प्रदीप नातू, विजय कडव, अभिमन्यू गायकवाड, राजा सावंत, कांचन कुलकर्णी, राकेश मुथा, प्रतिक पेणकर, दया गायकवाड, जतिन प्रजापती, वैभव हरदास, सुधीर वायले, कुणाल गायकवाड, सागर भालेकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights