उल्हासनगर व अंबरनाथ विधानसभेच्या निवडणुकीत आया राम गया रामच काम करणार नाही.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अंबरनाथ आणि उल्हासनगर विधानसभेतून निवडणूक लढवण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी, व त्यांची मतं जाणून घेण्यासाठी अंबरनाथमध्ये मनसे ची आढावा बैठक पार पडली.या बैठकीत दोन्ही विधानसभांमधून मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला,तसेच काही इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची ईच्छाही व्यक्त केली.याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केला जाणार असून वरिष्ठ पातळीवर लवकरच याबाबतचा निर्णय होईल असे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांनी सांगितले. मात्र या वेळेला आया राम गया राम यांना तिकीट देऊ नये आशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.इतर पक्षातल्या आयात केलेल्या उमदेवाराचा आम्ही प्रचार आम्ही करणार नाही असं स्पष्ट मत दोन्ही विधासभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.त्यामुळे या वेळेला इतर पक्षातील उमेदवाराला तिकीट देण्यात येणार नाही असं मत उल्हासनगर शहर अध्यक्ष संजय घुगे व अंबरनाथ शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांनी मांडलं इतर पक्षातुन लोक येतात निवडणूक लढवतात व नंतर पुन्हा पक्ष सोडून इतर पक्षात जातात व आमच्याच पक्षाची बदनामी करतात त्यामुळे यावेळेला बाहेरचा उमदेवार नको म्हणून कार्यकर्ते आक्रमक असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी सांगितले.याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हा संघटक संदीप लकडे, दिलीप थोरात उपजिल्हा अध्यक्ष शैलेश शिर्के, प्रदीप गोडसे,उल्हासनगर शहर अध्यक्ष संजय घुगे,अंबरनाथ शहर अध्यक्ष कुणाल भोईर मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, तालुका अध्यक्ष अश्विन भोईर,ऍड.स्वप्नील बागुल अविनाश सुरसे अनिल जाधव वैभव कुलकर्णी सचिन अंबोकर यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.