दहावी-बारावी परीक्षांच्या काळात विद्युत पुरवठा खंडित न करण्याची मागणी.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना विद्युत पुरवठा खंडित होण्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येत असल्याने विद्युत वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
मागील ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत उल्हासनगर पूर्व परिसरातील पडगा-अंबरनाथ फीडरवरून अचानक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. विशेष म्हणजे हा प्रकार परीक्षेच्या आदल्या दिवशी घडल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठा अडथळा निर्माण झाला.
सर्व विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये इन्व्हर्टर किंवा पर्यायी प्रकाशव्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत अभ्यास करणे अधिक कठीण जात आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित झाल्यास परीक्षार्थींच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो.
ही गंभीर बाब लक्षात घेता, परीक्षा काळात वीज पुरवठा खंडित करू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत विद्युत बंद करावी लागल्यास विद्यार्थ्यांना वेळेवर एसएमएसद्वारे माहिती द्यावी, अशी मागणी ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अति कार्यकारी अभियंता, अशेळे कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दहावी-बारावी परीक्षांच्या काळात विद्युत पुरवठा खंडित न करण्याची मागणी\n\nउल्हासनगर: दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना विद्युत पुरवठा खंडित होण्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येत असल्याने विद्युत वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.\n\nमागील ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत उल्हासनगर पूर्व परिसरातील पडगा-अंबरनाथ फीडरवरून अचानक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. विशेष म्हणजे हा प्रकार परीक्षेच्या आदल्या दिवशी घडल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठा अडथळा निर्माण झाला.\n\nसर्व विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये इन्व्हर्टर किंवा पर्यायी प्रकाशव्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत अभ्यास करणे अधिक कठीण जात आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित झाल्यास परीक्षार्थींच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो.\n\nही गंभीर बाब लक्षात घेता, परीक्षा काळात वीज पुरवठा खंडित करू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत विद्युत बंद करावी लागल्यास विद्यार्थ्यांना वेळेवर एसएमएसद्वारे माहिती द्यावी, अशी मागणी ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अति कार्यकारी अभियंता, अशेळे कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\n\nविद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\n\n\n