हिंदी भाषी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी खा.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे उल्हासनगर मध्ये उत्तर भारतीय भवन होण्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर मधील हिंदी भाषिक फाउंडेशन व इतर उत्तर भारतीय समाज संघटना यांची वर्षानुवर्षेची समाज-भवन उभारण्याची मागणी होती.या मागणीचा गांभीर्याने विचार करून उल्हासनगर शिवसेना शहर शाखा व शहर प्रमुख माननीय श्री.राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) व हिंदी भाषिक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी खा.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे उल्हासनगर मध्ये उत्तर भारतीय भवन होण्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली.खा.डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी यावर सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर मिटींगचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.तसेच यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री अरुण अशान,शिवसेना शहरप्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज),महानगर प्रमुख श्री राजेंद्र चौधरी, हिंदी भाषी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री संतोष पांडेय,युवासेना कल्याण जिल्हा सचिव श्री हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की),महिला अध्यक्ष नीतू विश्वकर्मा,उपाध्यक्ष श्री सुरेश चौहान, महेश यादव,महासचिव प्रमोद पांडेय,कोशाध्यक्ष बिपीन सिंह,विक्की चौहान व इतर उत्तरभरतीय उपस्थित होते.