एड. जय गायकवाड यांच्या पुढाकाराने भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन – युवकांसाठी सुवर्णसंधी!

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
स्वराज्य संघटनेच्या वतीने, एड. जय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने, ८ वी पासपासून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी एक भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा रोजगार मेळावा शनिवार, दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत
स्वामी शांती प्रकाश हॉल, गुरुनानक शाळेजवळ, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर-४ या ठिकाणी पार पडणार आहे.
संघर्षातून परिवर्तनाकडे!
छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त, स्वराज्य संघटनेने “शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!!!” या ब्रीदवाक्यानुसार समाजातील तरुणांना सक्षम बनवण्याचा संकल्प केला आहे.
मेळाव्याचे वैशिष्ट्ये:
नामांकित कंपन्यांचा सहभाग
HR अधिकारी थेट मुलाखती घेणार
शॉर्टलिस्टेड उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर
रोजगार मिळेपर्यंत संघटनेतर्फे सातत्याने फॉलोअप
दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष संधी (१० वी पास ते पदवीधर पात्र)
नोंदणी पूर्णतः मोफत असून, उमेदवारांनी पाच प्रत रिझ्युमे सोबत आणाव्यात. रोजगार केवळ योग्यतेनुसारच दिला जाणार आहे.
प्रमुख आयोजक:
आयु. प्रशांत उबाळे (सदस्य, स्वराज्य संघटना) – 8452071350
आयु. प्रमोद गायकवाड (सदस्य, स्वराज्य संघटना) – 8669186687
आपल्या सोबत, नेहमीच – स्वराज्य संघटना!
– एडवोकेट जय गायकवाड,
संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य संघटना
9503969098 / 7276104882
युवकांनो, ही संधी सोडू नका – चांगल्या नोकरीकडे पहिला पाऊल टाका!