वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या दालनात कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या व्ही. सी. द्वारे उपस्थितीत अंबरनाथ येथिल वैद्यकीय कॉलेज व रुग्णालय बाबत बैठक पार पडली.
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या दालनात कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या व्ही. सी. द्वारे उपस्थितीत अंबरनाथ येथिल वैद्यकीय कॉलेज व रुग्णालय बाबत बैठक पार पडली.
या बैठकीत माननीय सचिव साहेबांकडून कॉलेज करिता इमारत उपलब्ध करून देण्या बाबतच्या प्रस्तावाची मंजुरी करून घेण्यात आली, हॉस्पिटलच्या एम.ओ.यू. चा प्रस्तावा बाबत चर्चा करण्यात आली, मनुष्य बळ विषयावर चर्चा करण्यात आली तसेच एन. एम. सी. करिता आवश्यक पदे यावर भर देऊन माननीय आयुक्त यांना सुचविण्यात आल्या.
यावेळी, आमदार डॉ. बालाजी किणीकर,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व आयुष उपसंचालनालय आयुक्त, संचालक,अंबरनाथ वैद्यकीय कॉलेजचे अधिष्ठाता श्री. वर्माजी,व इतर अधिष्ठाता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.