प्रभाग क्रमांक १८ मध्ये होणाऱ्या अनियमत पाणी पुरवठया बाबत मनसे आक्रमक.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
प्रभाग क्रमांक १८ सुभाष टेकडी परिसरातील दहाचाळ,डिफेन्स कॉलनी महात्माफुले कॉलनी,नालंदा शाळा परिसर,भिमशक्तीनगर,आम्रपालीनगर,पं चशीलनगर, साईबाबानगर,कानसई रोड, भारतनगर, राजपूत लाईन,व अजून काही परिसरात उल्हासनगर महानगर पालिके कडून गेल्या अनेक वर्षापासून अनियमित पणे व कमीदाबाने पाणी पुरवठा केला जातोय.व या बाबत पालिका प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करून सुद्धा या विभागातील पाणी पुरवठयाबाबत प्रशासनाने कोणतीही सुधारणा केली नाही.किंवा याकडे गांभीर्याने बघितले नाही.या सर्व विभागात पाणी कधी सकाळी ६ वाजता तर कधी ७ वाजता येते तर कधी ११ वाजता तर कधी दुपारी ३ वाजता तर कधी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान तर कधी रात्री ११ वाजता तर कधी रात्री १२.३० वाजता पाणी पुरवठा केला जातो.हल्ली तर कहर झालाय रात्री १ ते २ च्या दरम्यान सुद्धा पाणी पुरवठा केला जातोय.ही बाब मनसेचे बंडू देशमुख यांनी आयु्क अजिज शेख यांच्या निदर्शनास आणली.उल्हासनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून अनियमित पणे या विभागात केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठयामुळे या विभागातील नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.आम्ही आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती केली की या विभागातील पाणी पुरवठयाचे नियोजन करून या परिसरातील नागरिकांना दिलासा दयावा परंतु आपले अधिकारी या परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासा बाबत गंभीर दिसत नाहीत असा आरोप जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी प्रशासनावर केला.या कृत्रिम पाणी टंचाई बाबत आम्ही माहिती घेतली असता आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार MIDC च्या पालेगाव लाईन वरून येणार पाणी अगोदर खाडी मशीन जलकुंभ मग दशेरा मैदान जलकुंभ नंतर नेताजी जलकुंभ व शेवटी कुर्लाकॅम्प जलकुंभ भरला जातो.हा जलकुंभ सर्वात शेवटी भरला जात असल्यामुळे या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते आपले अधिकारी अगोदर उच्चभ्रू लोकांची व दबंग माजी नगरसेवकांच्या विभागाची काळजी घेतात नंतर झपोडपट्टी वाल्यांची असे चित्र निर्माण झाले आहे.कारण आपल्या पाणी पुरवठा विभागातील नेताजी जलकुंभ व दसेरा मैदान जलकुंभावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने व काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली काम करण्यामुळे कुर्लाकॅम्प जलकुंभा पर्यंत पाणी वेळेत पोहचत नाही.व त्यामुळे या विभागात अनियमित पणे व कमी दाबाने पाणी पुरवठा होतो.तरी हे सर्व प्रकार तात्काळ थांबवण्यात यावेत तसेच खडी मशीन पासून कुर्लाकॅम्प जलकुंभा पर्यंत स्वतंत्र पाईप लाईन टाकण्यात यावी जेणे करून हा जलकुंभ वेळेत भरेल व या परिसरात पाण्याचे नियोजन करून या विभागातील नागरिकांना दिलासा मिळेल.
उल्हासनगर महापालिकेने काही वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून काही उल्हासनगर ४ – मधील लालचक्की वॉटर सप्लाय येथे या विभागाततील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी एक जलकुंभ बांधले परंतु काही तांत्रिक कारणामुळे या जलकुंभात पाणी भरले जात नाही.जर हा जलकुंभ सुरुच करायचा नव्हता तर मग प्रशासनाने यावर लाखो रुपये का खर्च का केले.या बाबत अतिरिक्त आयुक्त व कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्या दालनात अनेक वेळा चर्चा करण्यात आली.कित्तेक महिने व वर्ष उलटले परंतु जलकुंभ काही सुरु होईना.तरी हा जलकुंभ तात्काळ सुरु करण्यात यावा. तसेच प्रभाग क्रमांक १८ मधील पाणी प्रश्न तात्काळ सोडवावा अन्यथा मनसे पद्धतीने आंदोलन केल जाईल असा ईशारा मनसेच्या वतीने आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना देण्यात आला.यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,शहर अध्यक्ष संजय घुगे, उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,शैलेश पांडव,विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे,प्रकाश कारंडे, सुहास बनसोडे,यांच्यासह सुनील रोहिडा,अमित सिंग,विक्की जिप्पसन,सचिन सिरसाठ,रमेश जाधव इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.