उल्हासनगर तहसीलदार कार्यालय व अशोका फाउंडेशनच्या वतीने विविध दाखल्यांच्या शिबिराचे आयोजन.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर तहसीलदार कार्यालय व अशोका फाउंडेशनयांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदाआर कदम मॅडम नायाब तहसीलदार बनसोडे सर भोये मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या प्रयत्नाने आज दिनांक 31 जुलै 2024 रोजी समाज मंदिर हॉल,सम्राट अशोक नगर, उल्हासनगर 03 येथे भटक्या विमुक्त जातीतील( NT, VJNT) नागरिकांना जातीचे दाखले व विविध प्रमाणपत्रांकरिता शिबिर तसेच आधार कार्ड, राशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, मतदान कार्ड, रहीवास व उत्पनाचे दाखले अश्या शासनाच्या विविध उपक्रम शिबिर राबविण्यात आले.नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन शिबिराचा लाभ घेतला
सदर शिबिराला उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाचे तहसीलदार कदम मॅडम नायब तहसीलदार बनसोडे सर रेशनिंग ऑफिसर तसेच विविध अधिकारी उपस्थित होते.