आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे – भगव्या सप्ताहाच्या बैठकीत करण्यात आला संकल्प

श्री मलंगगड : नीतू विश्वकर्मा
आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्वेतून उमेदवार निवडून आणण्यासह उध्दव ठाकरे यांनाच पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचे असा संकल्प करण्यात आला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा उपक्रमांतर्गत आणि भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने श्री मलंगगड परिसरात झालेल्या बैठकीत पदाधिकारी – कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा संकल्प करण्यात आला.
संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या उपस्थितीत भगवा सप्ताह निमित्त महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे, विधानसभाप्रमुख नारायण पाटील, तालुका प्रमुख सुरेश पाटील, उपतालुका प्रमुख दिपक पाटील, प्रभाकर पाटील, विभागप्रमुख मोहन फुलोरा, अमीर पाटील, विजय पाटील, जिल्हापरिषद गट प्रमुख हनुमानबुवा पाटील, शाखाप्रमुख धनाजी दाभाणे, रवी भोईर ,अशोक मडवी, राजेश वारे ,गुरनाथ पाटील, दळवी ,अभिमन्यु भंडारी ,अनिल चिकणकर ,अभिमन्यु भाग्यवंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.