जागतिक आदिवासी दिनानिमित्त अंबरनाथ येथे भव्य रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन.
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
दि.०९ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो, त्याचाच भाग म्हणून आपल्या अंबरनाथ शहरात देखील अनेक दशकांपासून खूप आदिवासी बांधव आपल्या सोबत मिसळून वास्तव्य करीत आहेत.
तरी आज अंबरनाथ पश्चिम येथील खामकर वाडी चौक येते आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ यांच्या वतीने आदिवासी समाज जनजागृती मेळावा व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.नगराध्यक्षा सौ.मनिषाताई वाळेकर व मा.उपनगराध्यक्ष श्री.राजेंद्र वाळेकर हे उपस्थित राहून महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत जमलेल्या आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या.
हजारो आदिवासी बांधव एकत्र आल्याने व साऱ्यांनीच पारंपारिक वेशभूषा केल्याने संस्कृतीचे व एकतेचे दर्शन घडले, व नेहमीच आपण सर्वांनी एकत्र राहावे तसेच समाज बांधवांना कधीही काहीही लागल्यास आम्ही नेहमी उपलब्ध आहोत अशी यावेळी त्यांनी विचार व्यक्त केल्या, त्यानंतर आदिवासी बांधवांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये पावरी,शिवली,पावरा अशा नृत्य प्रकारांसह पारंपारिक आदिवासी गीत बोलत खामकरवाडी ते अंबरनाथ तहसीलदार पर्यंतचा रॅली काढत मोठ्या जल्लोषात व पारंपारिक पद्धतीने आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मा.नगरसेवक श्रीनिवास वाल्मिकी,आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री.राजाराम लोटे,मंडळाचे श्री.प्रदीप घिगे,श्री.भगवान असवले,श्री.नत्थु वालकोळी,श्री.मुठे महाराज,श्री.प्रदीप वालकोळी,श्री.अरुण करवंदे,श्री.काशिनाथ लोटे,महिला मंडळाचे सौ.गुलाब जाधव,सौ.प्रतिक्षा घीगे व मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.