Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
शिवसेना शहर प्रमुख श्री राजेंद्र सिंह भुल्लर महाराज यांचा पुढाकारांने शहरातील नागरिकांचा समस्या सोडवण्यासाठी तहसीलदारांची भेट.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
आज शुक्रवार दि.२८/०७/२३ रोजी उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख श्री .राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालय उल्हासनगर – 5 येथे उल्हासनगर शहरातील विविध समस्या सोडवण्या बाबत तहसीलदार कार्यालयात,तहसीलदार श्री.अक्षय ढाकणे यांची भेट घेण्यात आली.
उल्हासनगर तहसील कार्यालयातील सेतू कार्यालय जे काही दिवसांपासून बंद आहे ते त्वरित चालू करण्याची मागणी करण्यात आली.
अतिवृष्टीमुळे शहरातील सखल भागात पुराचे पाणी जाऊन , नुकसान झालेले आहे त्याचे त्वरित पंचनामे करून, बाधित नागरिकांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी ही मागणी करण्यात आली.
उल्हासनगर शहरातील जी घरे टेकड्यांवर आहेत व जिथे भूत्खलन होण्याचा धोका आहे. अशा ठिकाणची पाहणी करून तेथील नागरिकांचे त्वरित पुनर्वसन करावे अथवा तेथे संरक्षक भिंत बांधून द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
याप्रसंगी श्री.अरुण आशान शिवसेना उपजिल्हाप्रमुख, श्री.राजेंद्रसिंह भुल्लर ( महाराज) शिवसेना शहर प्रमुख, श्री.तिरुपती रेड्डी जिल्हा सचिव, श्री.नाना बागुल शिवसेना शहर संघटक, श्री.कलवंतसिंग सोहता (बिट्टू भाई) उपशहर प्रमुख, श्री.जयकुमार केणी उपशहर प्रमुख,श्री.अंकुश म्हस्के उपशहर प्रमुख,मा.नगरसेवक श्री. स्वप्नील बागुल,सौ.शुभांगी बेहेनवाल,शिवसेना विभाग प्रमुख,श्री .विनोद सालेकर,श्री .प्रमोद पांडे,श्री. कृष्णा सातपुते. शिवसेना वैद्यकीय शहर समन्वय श्री बिपीन सिंह समाजसेवक श्री. मनोहर बेहनवाल,शिवसेना उपविभागप्रमुख,श्री राजू साळवी,श्री.रवी मरसाळे,श्री.विकी चौहाण,श्री.समीर सय्यद,श्री .नवीन सातदिवे. तसेच यावेळी सर्व शाखाप्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.