म्हारळगावातील श्री भागवत कथेचा उद्या शेवटचा दिवस भक्तिमय वातावरणात उद्या सांगता..!



म्हारळ :नीतू विश्वकर्मा
म्हारळगावातील गावदेवी मंदिराच्या प्रांगणात बाल साध्वी राधादेवी वृंदावन यांच्या सुश्राव्य प्रवचनाने श्री भागवत कथा मागील ६ दिवसांपासून सुरू आहे. संपूर्ण ६ दिवस म्हारळकरांनी या कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष प्रमोद विनायक हिंदुराव आणि प्रतिक हिंदुराव यांच्या पुढाकाराने वृंदावन येथून बालसाधवी राधादेवी यांच्या वाणीने संगीतमय श्री भागवत कथेने गावात भक्तिमय वातावरण पसरले आहे. या वेळी गावातील चिमुकल्यानी राधा कृष्णा व शंकराचे रूप धारण करून मोठा सहभाग पाहिला मिळाला. उद्या २६ मार्च कथेचा शेवटचा दिवस आणि सायंकाळी आठ नंतर महाप्रसाद व कथेची सांगता होणार असून यावेळी सात दिवस प्रमोद हिंदुराव यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावलेली होती. म्हारळगावातील सामाजिक शैक्षणिक व धार्मिक आणि सामाजिक संस्थेच्या सहकार्यातूनच असेच हिंदुत्वाचे काम पुढे देखील करत राहू अशी भावना व्यक्त केली आहे.