टकारी समाज संस्था, अंबरनाथ यांचा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा तसेच महाराष्ट्र टकरी समाज भूषण, जीवन गौरव, उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रम अंबरनाथ पश्चिम येथिल महात्मा गांधी हॉल येथे पार पडला.




अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
टकारी समाज संस्था, अंबरनाथ यांचा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा तसेच महाराष्ट्र टकरी समाज भूषण, जीवन गौरव, उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रम अंबरनाथ पश्चिम येथिल महात्मा गांधी हॉल येथे पार पडला.गुणवंत शालेय विध्यार्थ्यांना शालेय वास्तू तसेच छत्री देण्यात आली.
या प्रसंगी टकारी समाजाद्वारे मला कार्यसम्राट पुरस्कार देखिल देण्यात आला. कामाचा जोरावर समाजाने मला हा पुरस्कार दिल्या बद्दल समाज बांधव तसेच उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी मा. नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे, श्री. विलास जोशी,श्री. सचिन पाटील,टकारी समाज अध्यक्ष गणेश गायकवाड,कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड,मुख्य विश्वस्थ शशिकांत गायकवाड, श्री. सिद्राम गायकवाड,श्री. चंद्रकांत जाधव, श्री सूर्यकांत जाधव,युवासेना विधानसभा अध्यक्ष श्री. हेमंत जाधव,उपाध्यक्ष श्री. परशुराम गायकवाड, श्री. यशवंत जाधव,टकारी समाज संस्थेचे पदाधिकारी, तसेच समाज बांधवांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.