Ulhasnagar
उल्हासनगर काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेत,महानगरपालिका प्रशासनाला आली जाग !
उल्हासनगर:- नीतू विश्वकर्म
उल्हासनगर काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेत,महानगरपालिका प्रशासनाला आली जाग !
उल्हासनगर भाजप पक्षाने प्रेस कॉन्फ़्रेंस घेउन १०० कोटिच्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला ,हे सर्व नौटंकी असल्याचा झाला पर्दाफाश !
महाराष्ट्र विधिमंडळ विरोधी पक्षनेता मा विजय वड्डेटेवर यांच्या आदेशाची घेतली दखल !
१५ मार्च रोजी उल्हासनगर काँगेस पक्षाच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या ढसाळ कारभार विरोधात व प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलन घेण्यात येणार होते, ज्या मध्ये प्रामुख्याने भाजप अध्यक्ष व नगरसेवकांनी १०० कोटीच्या भ्रष्टाचार झा पी अँड कंपनी वरील आरोपांचा चौकशी व खुलासा , CAG या संस्थाने महानगरपालिका प्रशासनावर घेतलेल्या आक्षेपांचा खुलासा ,गोल मैदान येथील अनधिकृत कब्जा हटवणे व पर्यावरण संबंधित विषय चा समावेश होता
परंतु प्रशासनाने याची दखल घेत , संबंधित मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी १५ मार्च ,दुपारी १ वाजता अतिरिक्त आयुक्त ज़मीर लेंग्रेकर यांच्या दालनात सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी सोबत काँग्रेसच्या शिष्ट मंडळ यांची संयुक्त बैठक घेतली.
सादर बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रा द्वारे एक प्रकारे हा खुलासा केला कि भाजप अध्यक्ष,आमदार व नगरसेवक यांनी झा पी अँड कंपनीवर केलेले सर्व आरोप माघे घेतले आहेत.
उल्हासनगर काँग्रेस पक्षाने जो आरोप पहिले केला होता कि हे सर्व विशिष्ट जवळीक लोकांना ठेका भेटावं म्हणून हि सर्व नौटंकी आहे आणि उल्हासनगर भाजप पक्ष हा जन हिता साठी नव्हे तर फक्त विशिष्ट ठेकेदारांच्या हिता साठी काम करत आहे, हे सिद्ध झाले आहे.
तसेच CAG ह्या संस्थेने जे कोणार्क व रिजेंसि निर्माण या गृह संकुल मधील काही गोष्टींवर जो आक्षेप घेतला त्या संदर्भातील लेखी अहवालाची प्रत हि देखील या बैठकीत आम्हाला पुरवण्यात आली आहे, सर्वच मांगण्यानं संदर्भात उत्तर प्राप्त झाले असल्याने व कारवाही चे आदेश काढण्यात आले असल्याने आंदोलन हे अद्याप माघे घेण्यात आले आहे.
पुढील कायदेशीर सल्ला घेऊन पुढची दिशा हि ठरवण्यात येईल , परंतु एकंदरीत ह्या सरकारमधील प्रशासकीय राजवटीत चालेला ढसाळ व भ्रष्ट कारभार याचा सत्य हे विरोधी पक्ष म्हणून उल्हासनगर काँग्रेस पक्ष जनते पर्येंत नेईल व येणाऱ्या निवडणुकीत जनताच ह्या लोकांना धडा शिकवेल अशी आम्हाला खात्री आहे.
सदर बैठकीत उल्हासनगर काँग्रेसच्या माजी नगरसेविका अंजली साळवे ,ब्लॉक अध्यक्ष नाणीक अहुजा , महिला अध्यक्ष मनीषा महाकाळे, प्रवक्त अशेराम टाक, उपाध्यक्ष फामिदा शेख, सचिव उषा गिरी,पर्यावरण सेल अध्यक्ष विशाल सोनावणे,परिवहन सेल अध्यक्ष आबा साठे, दीपक सोनावणे उपस्तिथ होते.
रोहित चंद्रकांत साळवे अध्यक्ष – उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस समिती याचिका दिली.