उल्हासनगरात मनसेच्या वतीने आयोजित शासकीय दाखल्यांच्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

उल्हासनगर प्रतिनिधि: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर १०वी व १२वीच्या निकालानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आणि विविध शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना व पालकांना तहसील कार्यालयाचे वारंवार हेलपाटे मारावे लागतात. यामुळे केवळ नागरिकांना नाही तर संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त ताणाचा सामना करावा लागतो.
उल्हासनगर कॅम्प क्र. १ मधील विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी उल्हासनगर-५ येथे जावे लागत होते. या गैरसोयीवर उपाय म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तानाजीनगर, एम. आय. डी. सी. रोड, उल्हासनगर-१ येथे एक दिवसीय शासकीय दाखल्यांचे शिबीर आयोजित केले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी मनसेचे मैनुद्दीन शेख, विभाग अध्यक्ष कैलास वाघ, कैलास घोरपडे, शाखा अध्यक्ष दिपेश धारिवाल, संजय नार्वेकर, जगदीश माने, मनोज चिंचनकर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.