लोकअदालत अंतर्गत मालमत्ता कर आणि पाणी बिलावर 100% अभय योजना राबवावी -आमदार कुमार आयलानी


उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली( माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली ) यांच्या निर्देशानुसार दिनांक 27 जुलै 2024 रोजी सर्वत्र राष्ट्रीय लोक अदालत चे भारतभर आयोजन केले आहे याच धर्तीवर उल्हासनगर महापालिकेत क्षेत्रात सुद्धा दिनांक 27 जुलै 2024 रोजी लोक अदालत घेऊन मालमत्ता करावर आकारण्यात येणारे विलंब शास्ती कर व पाणी बिलावर शंभर टक्के माफ करण्यासाठीं संबंधी अभय योजना लागू करावी अशी मागणी आमदार कुमार आयलानी यांनी दिनांक ९ जुलै 2024 रोजी माननीय आयुक्त तथा प्रशासक उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.