उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
आज ८ मार्च २०२३ रोजी “जागतिक महिला दिन” निमित्त
म.न.म.से. व समृद्धी फाऊंडेशनच्या वतीने प्रभाग क्र.१३ मधील हनुमान नगर, गणेश सोसायटी १ व २ या संपूर्ण परिसरातील रहिवाश्यांना मोफत धान्याचे वाटप घरो – घरी जाऊन करण्यात आले.सदर प्रसंगी महिला सेनेच्या मंजित कौर, कल्पना सोनवणे, संजनाल तांबे, छबी भांडे, सुशीला बोरकर, नीलम कक्कनवार, वर्षा मेश्राम, सुनीता दोंदे, पौर्णिमा बच्छाव, आम्रपाली कदम, प्रिया भागवत, किरण चव्हाण, संगीता साळवे, शालन जाधव आदि महिला उपस्थित होत्या.
सर्व नागरिकांनी मनसेचे आभार व्यक्त केले व कौतुकही केले.सदर प्रसंगी अँड.प्रदिप गोडसे, वैभव कुलकर्णी, संदेश भागवत, नितेश चव्हाण यांनी मेहनत केली व सहकार्य केले.

















