Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष वैभव माधव कुळकर्णी यांच्या वतीने न्यू इंग्लिश शाळेने मनमानी पध्दतीने भरमसाठ फी वाढवल्या प्रकरणी शाळा प्रशासन यांना निवेदन देऊन जी अतिरिक्त फी वाढ झालेली आहे ती तात्काळ रोखण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उल्हासनगर शहराच्या वतीने आज न्यू इंग्लिश स्कूलने आपल्या मनमानी पद्धतीने जी फी वाढ केली आहे त्या संधर्भात आज दिनांक ०४-०७-२०२३ रोजी शाळेला निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये शाळा प्रशासनाने जी अतिरिक्त फी वाढ केलेली आहे ती तत्काळ रोखण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उल्हासनगर शहराच्या वतीने देण्यात आले. ह्या अगोदर दिनांक १९-०६-२०२३ रोजी सुद्धा शाळेला निवेदन देण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत काही हि कार्यवाही न केल्या मुळे आज शाळा प्रशासनाला दिनांक ०७-०७-२०२३ रोजी मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.