अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
बदलापूर एम.डी.आर रस्त्याचे काम सुरू असून चिखलोली गावातील ग्रामस्थांसोबत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी रस्त्याची पाहणी केली तसेच जलद गतीने काम स्थानिक ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन पुर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. प्रशांत मानकर साहेब यांना देण्यात आले.
यावेळी समाजसेवक श्री. भरत तेलंगे,श्री. दिनेश कथोरे,शाखाप्रमुख श्री.नारायण धोंडे,ऍडव्होकेट श्री.उमेश भोईर, कैलास भोईर, श्री. श्रीकांत तेलंगे,तसेच स्थानिक चिखलोली गाव ग्रामस्थ उपस्थित होते.




