स्व. रोहीत भाई भोईर प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबिर.
कल्याण ग्रामीण: नीतू विश्वकर्मा
उद्या स्व.रोहीत भाई भोईर यांचा वाढदिवसा निमित्त आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.आपल्या कल्याण ग्रामीण भागातील २०० पेक्षा अधिक रक्तदाते यावेळी रक्तदान करतात.आपल्या परिसरातील २२ थॅलेसीमिया रुग्णांना व इतर गरजूंना आपण संकल्प ब्लड बँकच्या मदतीने त्यांना रक्ताची मदत करतो. स्व.रोहित भाई भोईर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो रुग्णांना मदत केली असून. रक्ताची गरज भासल्यास २४ तास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सदैव मदतीला धावून येतात याचा अनुभव अनेक रुग्णाला देखील आहे.आत्तापर्यंत मदत केलेल्या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना विनंती आहे की तुमच्या परिवारातील एक तरी सदस्यांनी उद्या २२ नोव्हेंबर २०२३ रोजी ठीक सकाळी १०ते ०५.०० वाजेपर्यंत येऊन आपले अनमोल सहकार्य करावे म्हणजे २०२४ या वर्षात आपल्याला अनेक रुग्णांना मदत करता येईल.