Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

उल्हासनगर शहरात सुसज्ज मराठी भवन उभारा – मनसे.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

उल्हासनगर शहरातील सिंधूभवनच्या धर्तीवर उल्हासनगर शहरात एक सुसज्ज मराठी भवन उभारण्यात यावं जेणे करून या मराठी भवन मध्ये मराठी संस्कृती,मराठी भाषा,मराठी परंपरा तसेच छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, यांच्यासह इतर महापुरुषान बद्दलची माहिती या मराठी भावनात उपलब्ध करून दिल्यास येणाऱ्या पिढयांना त्याचा नक्की फायदा होईल.तसेच या मराठी भवन मध्ये एक सुसज्ज नाट्यगृह असल्यास मराठी नाटक बसविण्यास साठी मराठी मुलांना त्याचा फायदा होईल.तरी उल्हासनगर शहरात एक सुसज्ज मराठी भवन व्हावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जातोय.मराठी भवनसाठी जो निधी व जागा लागणार आहे ती तात्काळ उपलब्ध करून दयावी आशी मागणी आज मनसेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी महापालिका आयु्क विकास ढाकणे यांच्याकडे केली.मा.आयुक्त विकास ढाकणे हे सुद्धा मराठी भवन बाबत सकारात्मक असून उल्हासनगर शहरातील मराठी बांधवानसाठी लवकरच एक सुसज्ज मराठी भवन नक्की उभ राहील आशी अशा आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख शहर अध्यक्ष संजय घुगे मा. विभाग अध्यक्ष अनिल गोधडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights