कल्याण पूर्वेतील चौकात प्रथमच एल.ई.डी. म्युझिकल लाईट्सद्वारे सुशोभीकरण.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माननीय आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आमदार निधीतून कल्याण पूर्वेतील विजयनगर मधील आमराई परिसरातील चौकात प्रथमच एल.ई.डी. म्युझिकल लाईट्सद्वारे सुशोभीकरण करून स्व.धर्मवीर आनंद दिघे चौकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी उपमहापौर विक्रम तरे, मंडळ अध्यक्ष संजय मोरे, मा. नगरसेवक अभिमन्यु गायकवाड, मा. नगरसेवक अनंता पावशे, मा. नगरसेविका मोनाली तरे, भाजपा पदाधिकारी नितेश म्हात्रे, संतोष शेलार, अमोल साळुंखे, विवेक त्रिवेदी, पद्मिनी कदम, विद्या मोरे, निशा सिंग, रमेश उडियार, सुरज इंगळे, अंजु शुक्ला व अनेक मान्यवर उपस्थित होते.