मनोज व्यवहारे यांची पारनेर युवासेना शहर प्रमुख पदी निवड विविध मान्यवरांच्या हस्ते वाढदिवस साजरा.
अहिल्याबाईनगर (पारनेर) : नीतू विश्वकर्मा
पारनेर शहराचे युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते मनोज सखाराम व्यवहारे यांची नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पारनेर शहर युवासेना शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.पारनेर तालुका प्रमुख पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे व युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे यांनी मनोज व्यवहारे यांना वाढदिवसानिमित्त नियुक्ती पत्रक भेट दिली.महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयात मनोज व्यवहारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत पारनेर शहरातील अनेक सामाजिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अहिल्याबाई नगरचे खासदार निलेश लंके,ठाकरे गटाचे तालुका प्रमुख पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे, युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, हंगागावचे सरपंच संदीप शिंदे,निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राजू सोंडकर, ग्रामपंचायत सदस्य राजू लोंढे, डॉक्टर सुनील गाडगे,संत सावता माळी सेवा केंद्राचे सागर व्यवहारे,हंगेश्वर कृषी सेवा केंद्राचे नितीन साठे, महेश शिंदे, सुयोग रासकर, प्रतीक व्यवहारे,पोद्दार पब्लिक स्कूलचे संस्थापक रामदास दळवी, सागर चौरे,योगेश व्यवहारे,यांच्या सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.