Breaking NewsfestivalheadlineHeadline Today

कुंभेफळ मध्ये सर्वधर्मीयांनी अनुभवलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं उदाहरण.

 

मराठवाड़ा : नीतू विश्वकर्मा


ईस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणजेच  ईद ए मिलाद हा सण संपूर्ण जगभरात मुस्लिम धर्मियबांधव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात,यावर्षी ईद ए मिलाद आणि अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाची मिरवणूक ही एकाच दिवशी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी येत असल्याने कायदा सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांनी मनाचे मोठेपण दाखवत ईद ए मिलाद हा सण गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्याचे ठरवले, मुस्लिम समाज बांधवांनी मनाचे औदार्य दाखवत हा निर्णय घेतल्याने आज दि.२९ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील मौजे कुंभेफळ,ता.परंडा याठिकाणी ईद-ए-मिलाद चा जुलूस निघालेला असतांना.

गावातील हिंदू धर्मियबांधवांनी जुलूस मधील मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प भेट देऊन त्यांच्यावर फुलांची उधळण करून समाजा-समाजांमध्ये आपापसांतील जोडली गेलेली बंधुभावाची नाळ किती घट्ट आहे, शिवाय जातीपातींचे विष कालवून समाजा-समाजांमध्ये  तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सडक्या मेंदूच्या घाणेरड्या विचारांना छत्रपती,शाहू,फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात थारा नसल्याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे दाखवून दिले.

यावेळी जयगणेश तरुण मित्र मंडळ अध्यक्ष तथा मनसेचे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष किशोर गायकवाड,उपाध्यक्ष योगेश आवाळे,सदस्य,उमेश आवाळे,प्रदीप आवाळे,बाळू आवाळे,रमेश आवाळे रामा सरवदे ,गणेश गायकवाड,हिराजी गायकवाड,तुषार गायकवाड,शिवाजी जाधव ,बाबुल शेख,प्रशांत आवाळे ,संतोष गायकवाड,विशाल सरवदे,किरण कांबळे ,अनिल आवाळे तसेच गावातली सर्वच लहान-थोर मंडळी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights