Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

मनविसेची विकास मंदिर शाळेला धडक, सुट्टी जाहीर असतांना देखील सुरू होती शाळा.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

दिनांक २६ जुलै २०२३ रोजी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, ठाणे यांच्या कडून अतिवृष्टीची इशारा लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली होती. परंतु आज दिनांक २७ जुलै २०२३ रोजी काही पालकांच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यालयात तक्रारी आल्या की सुट्टी जाहीर असताना देखील विकास मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळा, विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनच्या समोर हि शाळा चालू आहे. काही क्षणातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष  वैभव माधव कुलकर्णी, शहर संघटक अशोक गरड, शहर सचिव स्वप्नील त्रिभुवन आणि अजय बागुल ह्यांनी शाळेवर धडक दिली. सुट्टी जाहीर असताना सुद्धा शाळा चालू आहे ह्या बद्दल मुख्याध्यापक व शिक्षण अधिकारी साहेब ह्यांच्याशी दूरध्वनी वर चर्चा करण्यात आली. लागलीच शिक्षण अधिकारी साहेबांनी शाळा बंद करून सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश मुख्यध्यापक यांना दिले.








Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights