राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागातर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागरिकांना खीर वाटप.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर – ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव किरण शेजवळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे आयोजन रविवार दि १२ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले होते तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिजाऊ माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्ते आणि नागरिकांना, खीर वाटप करुन राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव किरण शेजवळ, उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष जनार्दन (अनिल)बंगाळे, महासचिव हरिश्चंद्र मल्हे, युवा अध्यक्ष अनिल शिरसाठ, कार्याध्यक्षा कांचन शेजवळ, महासचिव रोशना गायकवाड, शहर अध्यक्ष विद्याताई मोरे, उपाध्यक्षा उज्वला निकम, उपाध्यक्षा निलम शिरसाठ, भारत मोरे. धर्मनाथ निकम , मयूर मोरे. रोहित निकम, सोनाली निकम, शोभा नरवाडे, मंदा निकम, वैशाली भालेराव , चित्रा ब्राम्हणे आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.