Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

वाहतूक पोलिसांकडून मारल्या जाणाऱ्या चुकीच्या ई-चलन विरोधात म न वा से चे शहर वाहतूक शाखेला निवेदन.

 

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार,महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष श्री संजय नाईक साहेब तसेच सरचिटणीस श्री आरिफ भाई शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज १ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजता  महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील शहर वाहतूक शाखांना निवेदन देण्यात आले.उल्हासनगर येथेही चुकीच्या पद्धतीने मारले जाणाऱ्या ई-चलन संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष श्री काळू विश्वनाथ थोरात यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक शाखा, उल्हासनगर-१ येथे निवेदन देण्यात आले,तसेच वाहतूक पोलिसांनी गोर-गरीब रिक्षा चालकांना सहकार्य करावे,सौहार्दाने वागावे यासाठी गुलाब पुष्प ही देण्यात आले. यावेळी मनसेचे मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे काळू थोरात,बादशहा शेख,कैलास वाघ,अश्फाक शेख,अमित फुंदे,कैलास घोरपडे,राहुल वाकेकर, संजय चकोर,महेश साबळे,संजय नार्वेकर,जगदीश माने,शुभम कांबळे,मधुकर बागुल,अजय इंगोले,सतीश गांगुर्डे,अहमद शेख,सचिन आहिरे,सचिन मुलजकर,रवी खेडकर,प्रवीण माने,पंकज भोईर,कैलास काटे,अशोक लोंढे, ईश्वर पगारे तसेच
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहरातील पदाधिकारी आणि रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights