उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत राष्ट्रीय अग्निशमन दिन साजरा करण्यात आला.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
१४ एप्रिल, २०२३ राष्ट्रीय अग्निशमन दिन उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत करण्यात आला. सदर कार्यक्रमास मा. प्रशासक तथा आयुक्त श्री. अजीज शेख, मा अतिरिक्त आयुक्त (सेवा) डॉ. श्रीमती करुणा जुईकर मा अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. जमीर लेंगरेकर, मा उप आयुक्त (मुख्यालय), अशोक नाईकवाडे, उप- आयुक्त (आरोग्य) श्री. सुभाष जाधव, मुख्य लेखा परिक्षक श्री. शरद देशमुख मुख्य लेखा अधिकारी श्री. भिलारे पण अधिकारी मोरे सर, जनसंर्पक अधिकारी छाया डांगळे, व भांडार विभाग प्रमुख, अंकुश कदम इत्यादी मान्यवरांनी विरगती प्रप्त झालेल्या जवानांला हुतात्मा स्मारकास श्रध्दांजली वाहीली.
तसेच अमृत महोत्सव ७५वी भारतीय स्वतंत्रता जयंती निम्मित अग्निशमन विभागातील धडाडीचे कार्य करण्याऱ्या १० अधिकारी/कर्मचारी ह्यांना ७५वी स्वतंत्रता जयंती पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
तसेच आज १४ एप्रिल, २०२३ डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती मा. प्रशासक तथा आयुक्त व अति आयुक्त (सेवा) डॉ. श्रीमती करुणा जुईकर, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. जमीर लेंगरेकर, तसेच इतर अधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन महापालिका प्रांगणात साजरी केली.