शिवजयंती- २०२३ चे औचित्य साधून अंबरनाथ पूर्व ते उल्हासनगर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत आमदार डॉ बालाजी कीनीकिर च्या वतिने भव्य मिरवणुकीचे” आयोजन करण्यात आले होते.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
शिवजयंती- २०२३ चे औचित्य साधून अंबरनाथ पूर्व येथील ग्रीन सिटी- रॉयल पार्क- नवरे नगर- सोमेश्वर नगर- हरिओम पार्क- निसर्ग ग्रीन- बी केबिन रोड या परिसरात, तसेच उल्हासनगर येथील कॅम्प- ५, कैलाश कॉलनी ते कॅम्प- ३, छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत “भव्य मिरवणुकीचे” आयोजन करण्यात आले होते. या मिरवणूकीत शामील होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक प्रणाम केला.या समयी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष सर्व उपस्थित शिवभक्तांकडून करण्यात आला व ढोल ताशाच्या नादवृंदात संपूर्ण माहोल दुमदुमून गेला.या प्रसंगी सर्व उपस्थित शिवसेना पदाधिकारी व नागरिक यांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला उल्हासनगर महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी, उल्हासनगर शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण, अंबरनाथचे उप शहरप्रमुख श्री. पुरुषोत्तम उगले, माजी नगरसेवक श्री. उमेश गुंजाळ, युवासेना उपजिल्हाअधिकारी श्री. युवराज पाटील, उल्हासनगर युवासेना शहराधिकरी श्री. सुशील पवार, इतर माजी नगरसेवक-नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.