उल्हासनगरात मनसेकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन







उल्हासनगर प्रतिनिधी : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज सन्माननीय राज ठाकरे यांचा ५७ वा वाढदिवस संपूर्ण राज्यात जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर मनसेतर्फे विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
मनसेचे विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे यांच्या पुढाकाराने प्रभागात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळु थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील प्रमुख ठिकाणी – शहाड स्टेशन परिसर, डी-मार्ट चौक, १ नंबर बस स्थानक परिसर आणि इतर चौकांमध्ये लाडू वाटप करून उत्सव साजरा केला.
वाढदिवसाच्या निमित्ताने नागरिकांकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, मराठी जनतेचे आणि महाराष्ट्राचे पुन्हा नेतृत्व करावे, अशी मनोमन भावना व्यक्त करण्यात आली. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन राज्यातील अराजकतेला आवर घालून महाराष्ट्राला पूर्वपदावर आणावे, अशा शुभेच्छाही नागरिकांनी दिल्या.
या कार्यक्रमाला मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर संघटक काळु थोरात, विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे, कैलास वाघ, उप-विभाग अध्यक्ष गोरख उदार, शाखा अध्यक्ष दीपेश धारिवाल, जगदीश माने, रोहित सिंग, संतोष शर्मा, अमित मिश्रा तसेच अन्य महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र नवसंघटनेच्या दिशेने वाटचाल करत आहे, आणि या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर मनसेने सामाजिक बांधिलकी जपत जनतेशी नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न केला, असे मत यावेळी व्यक्त झाले.