उल्हासनगर महानगरपालिकेच्या पत्रानंतर मनसे जिल्हा उपाध्यक्ष, अँड.प्रदिप कुसुम कारभारी गोडसे यांनी आपले आंदोलन तात्पुरते केले स्थगित.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर कॅम्प -४ भागातील लालचक्की चौक या ठिकाणी पाण्याच्या लाईनच्या खोदकामामुळे संपूर्ण चौक हा खड्डेमय झाला आहे त्याचबरोबर उल्हासनगर स्टेशन रोड येथे शर्मा डॉक्टर समोर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. त्यानुषंगाने मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिका यांस २५/११/२०२२ रोजी खड्डे बुजवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन ३०/११/२०२२ रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे मा.आयुक्त महोदय व सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देण्यात आले होते त्यांनतर आज गुरुवार दि.२९/११/२०२२ रोजी उल्हासनगर महानगरपालिका यांनी सदर काम हे शुक्रवार दि.०२.१२.२०२२ रोजी करणार असल्याचे लेखी पत्र प्रदिप गोडसे यांना देण्यात आले त्यानुषंगाने आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याची माहिती प्रदिप गोडसे यांनी दिली. जर काम नाही झाले तर पुन्हा आंदोलन केले जाईल असे देखील प्रदिप गोडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले..!