उल्हासनगर आर पी आय पक्षाचे युवा संपर्क प्रमुख श्री निलेश माने यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर आर पी आय पक्षाचे युवा संपर्क प्रमुख श्री निलेश माने यांनी आज जिल्हाप्रमुख श्री गोपाळ लांडके व शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांचा मार्गदर्शन खाली त्यांच्या सह रवी यादव,केशर पाटील,राहुल गायकवाड, यांचा सह असंख्य समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला.
निलेश माने मागील दहा वर्षांपासून ते सामाजिक चळवळीत सातत्याने सक्रिय राहिलेले आहेत. समाजाच्या प्रश्नांसह कष्टकरी,समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी निलेश माने नेहमीच आवाज उठवलेला आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अंगिकारून बाळासाहेबांची शिवसेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते नक्की प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना चे जिल्हाप्रमुख गोपाळ जी लांडके साहेब बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उल्हासनगर शहराचे जेष्ठ नेते राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज),मा नगरसेवक अरुण अशान साहेब,जेष्ठ समाजसेवक नाना बागुल जी,मा.नगरसेवक कुलवन्त सिंग सोहता,मा नगरसेवक जयकुमार केणी,कल्याण लोकसभा सचिव तिरुपती रेड्डी,मा.नगरसेवक अंकुश म्हस्के,विभाग प्रमुख विनोद सालेकर,प्रमोद पांडे,शिवसेना वैद्यकीय मद्दत कक्ष चे लोकसभा गणेश साळुंके युवासेना सचिव दीपक रत्नाकर,समाजसेवक नंदू भोईर,शाखाप्रमुख सचिन भोईर,प्रदीप रेसवाल,शैलेश हिमगिरे,तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.