मुस्लिम समाजाच्या बहिणींकडून राज ठाकरे यांना राखी पाठवून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहरातील मनसेच्या मुस्लिम महिला पदाधिकारी आणि ईतर सामाजिक संस्थांच्या महीला भगिनींकडून महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आणि लाखो मराठी जणांचे कैवारी श्रीमान राज साहेब ठाकरे यांना भेटण्याचा योग कधी आला नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या भावाला पोस्टाने राखी पाठवून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतांना खूप आनंद होत असल्याचे शफिया सय्यद या मुस्लिम महिला भगिनीने यावेळी सांगितले.
तसेच महाराष्ट्रातील महिला,मुलींवरील होणारे अन्याय,अत्याचार यावर पायबंद घालायचा असल्यास श्री राज साहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवेत असा विश्वासही या महिलांनी व्यक्त केला.
आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती,कायदा आणि सुव्यवस्था,असुरक्षित महिला वर्ग आणि तरुण पिढीच्या हाताला रोजगार मिळवून देण्याची धमक फक्त आणि फक्त श्रीमान राज साहेब ठाकरे या आमच्या लाडक्या भावामध्येच असल्याने राज ठाकरे हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री व्हावेत हा आमच्या सारख्या बहिणींचा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे आणि राज ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी नव्हे तर हमखास मुख्यमंत्री आहेत असा विश्वास देखील या मुस्लिम महिला भगिनींनी बोलून दाखवला.
यावेळी मनसेच्या शफिया सय्यद,सलमा शेख,मुजाहिदा शेख,बेबी सय्यद,आर्शिया शेख,सुमैय्या शेख,अन्सारी सय्यद,रेशमा सय्यद आणि महिला वर्ग उपस्थित होता.