उल्हासनगरचे माजी नगरसेवक प्रमोद टाले यांच्या सुपत्राची गगन भरारी…!* *अभिषेक प्रमोद टाले याची IAS पदी झेप…!
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिका चे माजी नगरसेवक तसेच भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर कार्यरत अध्यक्ष मा.प्रमोद टाले साहेब ह्यांचे चिरंजीव मा.अभिषेक प्रमोद टाले साहेब ह्यांनी UPSC परीक्षेत प्रावीण्य प्राप्त केले,२०१६ साली झालेल्या UPSC परीक्षेतही घव घवित यश प्राप्त करून अभिषेक ह्यांनी IRPS आर्थात इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस ह्या पदी मजल मारली होती,मात्र नोकरी सांभाळून पुन्हा जिद्दीने अभ्यास करत यंदाच्या UPSC चा परीक्षेतून २४९ व्या नंबर वर येऊन IAS पदाची झेप घेतली.’बुद्धिवंत लोकांना यश नेहमीच खुणावत असते असे म्हणतात अभिषेक प्रमोद टाले साहेब हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत …मा.अभिषेक प्रमोद टाले साहेब हे UPSC परीक्षेतही उत्तीर्ण होऊन IAS झाल्या बद्दल भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर अध्यक्ष अभिजीत भाऊसाहेब चंदनशिव, कार्यरत अध्यक्ष – प्रमोद टाले साहेब,अंबरनाथ शहर अध्यक्ष विनीता वाघ,उपाध्यक्ष-दिनेश वाघमारे,उपाध्यक्ष-चारुलता विश्वकर्मा,सचिव-योगेश केदार,सदस्य – उज्वला गायकवाड,विवेक खरे,सुनील जाधव,दिपक म्हस्के ह्यांचा वतीने IAS मा.अभिषेक प्रमोद टाले साहेब ह्यांचा व समस्त टाले कुटुंबीयांचा पुष्गुच्छ व शॅल देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले व अभिषेक ह्यांना त्यांच्या उज्वल भविष्य करीता मनापासून शुभेच्छा देण्यात आले.